आपला जिल्हास्थानिक

कथा, कीर्तन, भजन अन् हरिनामाचा गजर! श्रीराम नगरमध्ये कृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी

कृष्णजन्म सोहळ्याने परिसर भक्तिमय

कथा, कीर्तन, भजन अन् हरिनामाचा गजर! श्रीराम नगरमध्ये कृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी

कृष्णजन्म सोहळ्याने परिसर भक्तिमय

बारामती वार्तापत्र 

श्रीराम नगर, भिगवण रोड, जलोची, बारामती येथील वै. भगवानराव बाबुराव तावरे यांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

२९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झालेल्या या धार्मिक उत्सवांतर्गत संगीत श्रीमद्भागवत कथा, भजन, कीर्तन, हरिपाठ, जागर, भारूड, काकडा, महापूजा, होमहवन आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. बाळासाहेब महाराज पवार यांच्या अमोघ वाणीतून झालेल्या श्रीमद्भागवत कथेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ह.भ.प. कृष्ण महाराज मेहुणकर यांचे श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शेकडो भाविक भक्त सहभागी झाले होते.

श्रीराम नगरसह बारामती पंचक्रोशीतील श्रीरामभक्त आणि श्रीकृष्णभक्त मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी उपस्थित होते. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर कृष्णनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. संजय महाराज सायकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. या संपूर्ण सप्ताहादरम्यान बारामती नगरपालिकेकडून परिसरात स्वच्छता व्यवस्था ठेवण्यात आली होती.

दरवर्षी तावरे परिवाराच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी हे दोन धार्मिक उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. यंदाच्या उत्सवाचे आयोजनही उत्साहात पार पडले.

या धार्मिक सोहळ्याची माहिती संयोजक अॅड. हरीश तावरे, श्री. पांडुरंग तावरे आणि चि. ऋषिकेश तावरे यांनी दिली.

Back to top button