स्थानिक

बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांना पुत्रशोक; राजीव (साई) यांचे निधन

अल्पवयात काळाचा घाला?

बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांना पुत्रशोक; राजीव (साई) यांचे निधन

अल्पवयात काळाचा घाला?

बारामती वार्तापत्र 

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. श्री. किरण भाऊ इंगळे यांचे चिरंजीव राजीव (साई) किरण इंगळे यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बारामती शहरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजीव (साई) इंगळे यांच्या पश्चात एक बहीण, एक भाऊ तसेच मोठा परिवार असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राजीव इंगळे यांच्या निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक तसेच परिचितांमध्येही शोक व्यक्त केला जात असून, त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर मोठी दुःखद छाया पसरली आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि इंगळे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

Back to top button