“माळेगाव कारखाना आता शेतकऱ्यांच्या दारी!” गेटकेन ऊस उत्पादकांशी संचालक मंडळाचा थेट संवाद; अडचणींचे जागेवरच निरसन!
निरगुडे, वाखरी, मुळीकवाडीत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले संचालक; अडचणी आणि शंकांचे जागेवरच निरसन

“माळेगाव कारखाना आता शेतकऱ्यांच्या दारी!”
गेटकेन ऊस उत्पादकांशी संचालक मंडळाचा थेट संवाद; अडचणींचे जागेवरच निरसन!
निरगुडे, वाखरी, मुळीकवाडीत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले संचालक; अडचणी आणि शंकांचे जागेवरच निरसन
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी संचालक मंडळाने निरगुडे, वाखरी आणि मुळीकवाडी गावांचा झंझावाती दौरा केला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांच्या सूचनेनुसार हा दौरा करण्यात आला.
कारखान्याचे उपाध्यक्ष नितीनदादा शेंडे यांच्यासह संचालक जयपाल तात्या देवकाते, रतनदादा भोसले, विशाल भैय्या जगताप, शेतकी अधिकारी लिंभोरे साहेब तसेच कर्मचारी या दौऱ्यात सहभागी झाले.
या वेळी संचालक मंडळाने गेटकेन धारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या मनातील विविध शंका आणि प्रश्न समजून घेत त्यांचे जागेवरच निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
🤝 गावातच पोहोचले संचालक; शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
संचालक मंडळ गावात प्रत्यक्ष पोहोचल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “आज पहिल्यांदाच संचालक मंडळ आमच्या गावात येऊन थेट संवाद साधत आहे,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.
कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी अशा थेट भेटी महत्त्वाच्या ठरत असल्याचे यावेळी दिसून आले. माळेगाव कारखान्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सांगण्यात आले.
🌱 शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ
शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष त्यांच्या गावात जाऊन समजून घेणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि कारखाना प्रशासन व ऊस उत्पादक यांच्यातील संवाद वाढविणे, या उद्देशाने संचालक मंडळाचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला.







