बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाची वैष्णवी कुलकर्णीची ‘सीएस’ पदी यशस्वी झेप
वैष्णवीने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागातून बी.कॉम. पदवी ६८ टक्के गुणांसह पूर्ण केली आहे.

बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाची वैष्णवी कुलकर्णीची ‘सीएस’ पदी यशस्वी झेप
वैष्णवीने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागातून बी.कॉम. पदवी ६८ टक्के गुणांसह पूर्ण केली आहे.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामतीच्या वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी महेश कुलकर्णी हिने पदवी शिक्षणासोबतच कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) या व्यावसायिक अभ्यासक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जून २०२६ मध्ये झालेल्या CS Professional Programme परीक्षेत दोन्ही गट यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून तिने कंपनी सेक्रेटरी होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.
वैष्णवीने २०२३ मध्ये CSEET परीक्षा उत्तीर्ण करून कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर २०२४ मध्ये CS Executive चे दोन्ही गट यशस्वीरीत्या उत्तीर्ण केले. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने जून २०२६ मध्ये CS Professional चे दोन्ही गट उत्तीर्ण केले. Professional Programme च्या Group 1 मध्ये तिने २०५ गुण, तर Group 2 मध्ये १५५ गुण मिळविले.
कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करण्यासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि प्रेरणा वैष्णवीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत असताना शिक्षकांनी तिला कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची माहिती दिली तसेच हा अभ्यासक्रम करण्यासाठी प्रोत्साहित केले. अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे तिला बी.कॉम.च्या शिक्षणासोबत CS अभ्यासक्रमाचा यशस्वीपणे पाठपुरावा करता आला.
वैष्णवीने आपल्या शैक्षणिक प्रवासासोबत Devkar & Associates येथे Company Secretary Trainee म्हणून व्यावहारिक अनुभवही घेतला आहे. प्रशिक्षणादरम्यान तिने सचिवीय अनुपालन, कंपनी कायदा व SEBI नियमावली, करारपत्रांची निर्मिती व परीक्षण, नियामक नोंदणी तसेच Show-Cause Notice वरील उत्तरांचे मसुदे तयार करण्याचे काम केले आहे.
यासोबतच वैष्णवीने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागातून बी.कॉम. पदवी ६८ टक्के गुणांसह पूर्ण केली आहे. पदवी शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यांचा यशस्वी समतोल साधत तिने मिळविलेले हे यश विशेष उल्लेखनीय आहे.
वैष्णवी कुलकर्णी हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जवाहर शाह (वाघोलीकर), संस्थेचे सचिव मा. श्री. मिलिंद शाह (वाघोलीकर), सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, सर्व उपप्राचार्य, अधिष्ठाता, वाणिज्य विभागातील शिक्षक, सी.ए.फाऊंडेशन कोर्सचे शिक्षक तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.तसेच तिच्याउज्ज्वल व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात शिक्षण घेत असताना मिळालेल्या मार्गदर्शनातून, प्रेरणेतून आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर वैष्णवीने संपादन केलेले हे यश महाविद्यालय तसेच वाणिज्य विभागासाठी अभिमानाची बाब आहे.तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे






