सोमेश्वर
गाड्यांचा ताफा की राजकीय शक्तिप्रदर्शन? सोमेश्वर कारखाना निवडणुकीत चेअरमनवर सतीश काकडेंचा निशाणा
‘अजितदादा नसल्याचे पत्ते आम्ही पळतोय’!

गाड्यांचा ताफा की राजकीय शक्तिप्रदर्शन? सोमेश्वर कारखाना निवडणुकीत चेअरमनवर सतीश काकडेंचा निशाणा
‘अजितदादा नसल्याचे पत्ते आम्ही पळतोय’!
बारामती वार्तापत्र
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. मात्र, पहिल्याच दिवशी अर्ज दाखल केल्यानंतर शेवटच्या दिवशी पुन्हा ताफ्यासह अर्ज दाखल करण्याच्या कृतीवरून सतीश काकडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
या टीकेला विद्यमान चेअरमन किंवा त्यांच्या समर्थकांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे शेतकरी आणि सभासदांचे लक्ष लागले आहे. गाड्यांचा ताफा घेऊन अर्ज दाखल करण्यामागील भूमिका आणि त्याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज, नेतृत्वाची भूमिका आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिक चर्चेत आले आहे.






