राजकीय

विजय मिळाला, आठवण अजितदादांची!; सोमेश्वरच्या विजयी पॅनेलची स्मृतिस्थळाला भेट

विजयानंतर भावनिक क्षण!

विजय मिळाला, आठवण अजितदादांची!; सोमेश्वरच्या विजयी पॅनेलची स्मृतिस्थळाला भेट

विजयानंतर भावनिक क्षण!

बारामती वार्तापत्र 

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने विजय मिळवल्यानंतर युवा नेते जय अजितदादा पवार यांनी सर्व विजयी उमेदवारांसह स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या या भेटीत विजयी उमेदवारांनी स्व. अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन केले. या विजयाचे श्रेय त्यांच्या स्मृतींना समर्पित करत सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.

स्व. अजितदादा पवार यांचे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याशी असलेले नाते आणि सहकार क्षेत्रातील योगदान यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर जय पवार आणि विजयी उमेदवारांनी एकत्रितपणे स्मृतिस्थळाला भेट दिल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. निवडणुकीतील यशानंतर स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत विजयी पॅनेलने त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.

Back to top button