पुणे

‘मीसुद्धा एक आई आहे…’ पायलच्या आईच्या वेदना सुनेत्रावहिनींनी जाणल्या! न्यायासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार!

पायल झांबरे प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार ॲक्शन मोडमध्ये; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार!

‘मीसुद्धा एक आई आहे…’ पायलच्या आईच्या वेदना सुनेत्रावहिनींनी जाणल्या! न्यायासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार!

पायल झांबरे प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार ॲक्शन मोडमध्ये; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार!

पुणे :प्रतिनिधि

पायल झांबरे प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी पीडित कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पायलच्या आईशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या भावना आणि व्यथा जाणून घेतल्या. तसेच या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने आणि योग्य दिशेने व्हावा, यासाठी आपण नियमितपणे आढावा घेत असल्याचे स्पष्ट केले.

पायल झांबरे प्रकरणाचा तपास सुरू असून, या संदर्भात आपण पोलीस अधीक्षकांशीही चर्चा केली असल्याचे सुनेत्रावहिनी पवार यांनी सांगितले. तपासामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि प्रकरणातील वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी प्रशासनाच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पायलच्या आईशी संवाद साधताना सुनेत्रावहिनी पवार भावूक झाल्या. “तुमच्या भावना मला समजू शकतात. मीसुद्धा एक आई आहे. अशा प्रकारच्या घटना घडायलाच नकोत; मात्र दुर्दैवाने ही घटना घडली आहे. या कठीण प्रसंगी तुमच्या भावना आणि वेदना मी समजू शकते,” अशा शब्दांत त्यांनी पायलच्या आईला धीर दिला.

तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने व्हावा आणि केस फास्टट्रॅकवर घेण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे सुनेत्रावहिनी पवार यांनी सांगितले. पायलच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागण्याही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पीडित कुटुंबीयांच्या भावना समजून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला किती गती मिळते, फास्टट्रॅक प्रक्रियेबाबत काय निर्णय होतो आणि कुटुंबीयांच्या मागण्यांवर शासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button