काल बारामती व तालुक्यामध्ये ३९ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३७४९ वर गेली आहे.

काल बारामती व तालुक्यामध्ये ३९ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३७४९ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (१२\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने १०१. एकूण पॉझिटिव्ह- २२. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०४. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०३ त्यापैकी पॉझिटिव्ह -०१ कालचे एकूण एंटीजन ७८. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१६ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २२+०१+१६=३९. शहर-२० . ग्रामीण- १९. एकूण रूग्णसंख्या-३७४९ एकूण बरे झालेले रुग्ण-३३०१ एकूण मृत्यू– १०३.
बारामतीत काल तपासलेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये अंजनगाव येथील ८० वर्षीय पुरूष, रुई येथील २३ वर्षीय पुरूष, सुपे येथील ३० वर्षीय पुरूष, गुनवडी येथील १४ वर्षीय मुलगा, २ वर्षीय मुलगी,लोणीभापकर येथील २६ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील १९ वर्षीय युवक, शारदानगर येथील ४९ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
माळेगाव बुद्रुक येथील २६ वर्षीय महिला, ५२ वर्षीय महिला, ४१ वर्षीय पुरूष, तपोवन कॉलनी येथील २३ वर्षीय महिला, कसबा येथील ५६ वर्षीय पुरुष, टकार कॉलनी येथील ३० वर्षीय पुरूष, पिंपळी येथील ७० वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील २४ वर्षीय पुरूष, सृष्टी अपार्टमेंट बारामतीतील ५९ वर्षीय महिला, ६४ वर्षीय पुरूष, सोनगाव येथील ३३ वर्षीय पुरूष, ढाकाळे येथील ६० वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ५६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीत काल झालेल्या शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाशेजारील ३६ वर्षीय पुरूष, घाडगेवाडी येथील ७० वर्षीय महिला, वाणेवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, तांबेनगर येथील ३६ वर्षीय पुरूष, मेखळी येथील ३५ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील ४५ वर्षीय पुरूष, बयाजीनगर येथील ४६ वर्षीय पुरूष, घाडगेवस्ती येथील १६ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन नमुन्यांमध्ये मुलाणीनगर सदगुरू निवास येथील ८७ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, मळद येथील ३७ वर्षीय पुरूष, ढाकाळे येथील ३५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या आरटीपीसीआर नमुन्यांमध्ये कोऱ्हाळे येथील ७३ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आला आहे.
बारामतीतील गिरीजा लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या नमुन्यांमध्ये शारदानगर केव्हीके रोड येथील ३८ वर्षीय पुरूष व शारदानगर येथील ३० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.