कोरोंना विशेष

बारामतीत कोरोणाची आज ‘ माघार ‘

दिवसभरात फक्त पाच रुग्णांची नोंद

बारामतीत कोरोणाची आज ‘ माघार ‘

दिवसभरात फक्त पाच रुग्णांची नोंद

बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात कोरोनाने आपला आलेख नेहमी वाढताच ठेवला होता. दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढती राहत होती .मात्र आज दिवसभरात फक्त 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. काल झालेल्या एकुण शासकीय rt-pcr 14 नमुन्यांपैकी तालुक्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही, मात्र 14 नमुन्यांपैकी एक नमुना पॉझिटिव आला तो इतर तालुक्यातील असल्याने शासकीय rt-pcr चे सर्वच्या सर्व 14 नमुने निगेटिव आले आहेत. मात्र खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण 12, rt-pcr नमुन्यांपैकी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले व अँटीजन तपासणीचे बारा नमुन्यांपैकी 1 पॉझिटिव्ह आल्याने काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 5 एवढी खाली आल्याने प्रशासन व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात येत आहे. आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या 5613 असून बरे झालेले रुग्ण 5195 आहेत तर एकूण मृत्यू 135 इतके आहेत.

Check Also
Close
Back to top button