स्थानिक

बारामती व्यापारी महासंघाची उद्या महत्त्वपूर्ण विशेष बैठक; व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

व्यापारी हिताचे निर्णय तसेच भविष्यातील उपक्रमांबाबत मार्गदर्शन

बारामती व्यापारी महासंघाची उद्या महत्त्वपूर्ण विशेष बैठक; व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

व्यापारी हिताचे निर्णय तसेच भविष्यातील उपक्रमांबाबत मार्गदर्शन

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी, समस्या तसेच व्यापारी हिताच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत राजस्थान वस्त्रदालन, श्री महावीर पथ, बारामती येथे संपन्न होणार आहे.

सदर बैठकीत व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून त्यावर उपाययोजना, शासकीय नियमावली, व्यापारी हिताचे निर्णय तसेच भविष्यातील उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बारामती शहर व परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापारासंदर्भातील अडचणी, सूचना व प्रश्न मांडण्यासाठी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_