
आणि अभ्यासिकेच्या संचालकांनी स्वीकारले तिचे पालकत्व…
नोकरी मिळेपर्यंत
बारामती वार्तापत्र
घरी अभ्यास होत नाही, किंवा घरात अभ्यास कण्यासाठी पोषक वातावरण नाही किंवा अभ्यास करण्यासाठी खास रूम नाही किंवा शेजारी आवाज ,गोंधळ असतो आशा विद्यार्थ्यां च्या अभ्यासासाठी असलेल्या लक्षशिला अभ्यासिका,सुर्यनगरी बारामती मध्ये सामाजिक उपक्रम संपन्न झाला.
नवीन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी लक्षशिला फाउंडेशनचे संस्थापक अजय ओमासे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्यशिला फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांनी रेश्मा कांबळे तिचे पालकत्व स्वीकारले.
रेश्मा कांबळे आर्थिक दृष्ट्या गरीब पण अभ्यासात हुशार विद्यार्थ्यांनी आहे. अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत येत असते पालकत्व स्वीकारून आदर्शवत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
लक्षशीला फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. लक्षशिला फाउंडेशन हे नेहमीच युवकांसाठी कार्यक्षम असते. आज लक्षशीला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चि. अजय शिवाजी ओमासे यांचा वाढदिवस होता.
त्यानिमित्ताने त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे. त्या उपक्रमामध्ये ते प्रत्येक वाढदिवसाला एका गरजू विद्यार्थ्याचे पालकत्व स्वीकारणार आहेत.
त्यानुसार ०१ जानेवारी २०२५ पासून त्यांनी रेश्मा विजय कांबळे या विद्यार्थिनींचे पालकत्व स्वीकारले आहे. आज पासून तिला नोकरी मिळेपर्यंत तिचा सर्व खर्च लक्षीला फाउंडेशन मार्फत केला जाणार आहे.