स्थानिक

बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात २४ नगरसेवकांचे निवेदन; सभेतील भूमिकेची नोंद करण्याची मागणी

७७ पैकी ४० विषयांमध्ये हरकती

बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात २४ नगरसेवकांचे निवेदन; सभेतील भूमिकेची नोंद करण्याची मागणी

७७ पैकी ४० विषयांमध्ये हरकती

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर २४ नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून सभागृहातील त्यांच्या भूमिकेची अधिकृत इतिवृत्तात नोंद करण्याची मागणी केली आहे. संबंधित विषयावर सभेत आपले मत मांडण्यात आले होते, मात्र त्याची नोंद इतिवृत्तात झालेली नसल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे.

निवेदनानुसार, नगरपरिषदेच्या २३ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ५ संदर्भात काही सदस्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ही भूमिका अधिकृत नोंदीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सभागृहातील चर्चेचे वास्तव प्रतिबिंब इतिवृत्तात दिसावे, यासाठी संबंधित सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे आपले मत पुन्हा नोंदविले आहे.

सभागृहात मागील सभेचे इतिवृत्त कायम करताना ७७ पैकी ४० विषयांमध्ये हरकती नोंदवल्या या निवेदनावर तब्बल २४ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असून, सभागृहातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि सदस्यांची भूमिका अधिकृतपणे नोंदविण्यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे समजते.

नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू असून, संबंधित विषयावरील इतिवृत्तात सुधारणा केली जाणार का आणि प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट :
२४ नगरसेवक एकत्र

* सभागृहातील भूमिकेची नोंद करण्यासाठी निवेदन
* सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ५ संदर्भ
* इतिवृत्तात मत नोंद न झाल्याचा दावा
* मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी मागणी
* नगरपरिषद राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडले

Back to top button