इंदापूरात दवाखान्यातच डॉक्टरांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

डॉक्टर संघटनेकडून निषेध व्यक्त

इंदापूरात दवाखान्यातच डॉक्टरांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

डॉक्टर संघटनेकडून निषेध व्यक्त

इंदापूर प्रतिनिधी –

इंदापुरातील साईसेवा क्लिनिकमध्ये डॉ.प्रदीप दडस यांना लोखंडी स्टूल ने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.19) एप्रिल रोजी घडली असून या प्रकरणी तिघा जणांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत पोलिसांना निवेदन देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,इंदापूर शहरातील भार्गवराम बगीचालगत असलेल्या जुन्या अकलूज मार्गावर डॉ.प्रदीप दडस यांचे साइसेवा क्लिनिक आहे.

यामध्ये शनिवारी (दि.19) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नाना कोळेकर (रा. तरंगवाडी,ता.इंदापूर), दयानंद रामचंद्र जाधव, रवींद्र भंडलकर( दोघे रा. कौठळी ता.इंदापूर) यांनी कंपाउंडर व डॉक्टर दडस यांचे भाऊ यांना मारहाण केली.तसेच डॉक्टर दडस यांच्या उजव्या हातावर लोखंडी स्टूलने वार करत गंभीर दुखापत करीत लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली.यावरून इंदापूर ठाण्यात वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान इंदापूर शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध करत इंदापूर पोलीस ठाण्यात निवेदन दिले असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!