क्राईम रिपोर्ट

नसरापूरमध्ये ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; जातानाचा CCTV आला समोर..

६५ वर्षीय नराधम ताब्यात

नसरापूरमध्ये ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; जातानाचा CCTV आला समोर भोर

६५ वर्षीय नराधम ताब्यात

नसरापूर;प्रतिनिधि

पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सुट्टीसाठी आजोळी आलेल्या एका अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली.

या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुकली ही सुट्टीसाठी आपल्या आजीकडे नसरापूर येथे आली होती.

दुपारी घरासमोर खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ शोध घेऊनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. अखेर एका गोठ्यात या चिमुकलीचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत आढळून आला.

अत्याचार करून मृतदेह शेणाखाली लपवला स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव कांबळे (वय ६५) या व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला फूस लावून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली.

इतकेच नव्हे तर नराधमाने तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबून ठेवला होता. सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

यामध्ये आरोपी भीमराव कांबळे हा चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Back to top button