स्थानिक

बारामतीत १५८ मिमी पावसाचा तडाखा! दोन तासांत प्रशासनाची धडाकेबाज कामगिरी!

सुनेत्रावहिनींच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेची युद्धपातळीवर कामगिरी; नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांची पहाटेपासून धावपळ

बारामतीत १५८ मिमी पावसाचा तडाखा! दोन तासांत प्रशासनाची धडाकेबाज कामगिरी!

सुनेत्रावहिनींच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेची युद्धपातळीवर कामगिरी; नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांची पहाटेपासून धावपळ

अजितदादांच्या कार्यसंस्कृतीची झलक!

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात सोमवारी पहाटे मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत अवघ्या काही तासांत तब्बल १५८ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाले, तर मुख्य भिगवण रस्त्यासह प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, पावसाचा जोर ओसरताच नगरपरिषद प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू करत अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत केली.

उपमुख्यमंत्री तथा बारामतीच्या लोकप्रतिनिधी सुनेत्रावहिनी पवार यांच्या तातडीच्या मार्गदर्शनाखाली खासदार पार्थदादा पवार आणि युवा नेते जयदादा पवार यांच्या सूचनांनुसार नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, नगरसेवक आणि नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरले. पाणी काढणे, रस्त्यांवरील अडथळे दूर करणे आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आली.

दोन तासांत वाहतूक पूर्ववत; प्रशासनाची तत्परता

सकाळी सात वाजेपर्यंत झालेल्या १५८ मिमी पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. मुख्य भिगवण रस्त्यासह अन्य प्रमुख मार्गांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांनी केवळ सूचना न देता प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला. आरोग्य व स्वच्छता विभागासह संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पहाटेपासून काम करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत झाली.

सुनेत्रावहिनींचे मार्गदर्शन; पार्थदादा, जयदादांच्या सूचना

पावसाची तीव्रता लक्षात घेऊन सुनेत्रावहिनी पवार यांनी प्रशासनाशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांची गैरसोय टाळणे, सखल भागांतील पाण्याचा निचरा करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. खासदार पार्थदादा पवार आणि युवा नेते जयदादा पवार यांनीही परिस्थितीची माहिती घेऊन प्रशासनाला मार्गदर्शन केले.

अजितदादांची कार्यसंस्कृती कायम!

स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीला विकासाची दिशा देतानाच तत्परता, शिस्त आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्वरित कृती करण्याची कार्यसंस्कृती निर्माण केली. मुसळधार पावसाच्या संकटातही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानात उतरून केलेल्या कामातून ही कार्यसंस्कृती पुन्हा अधोरेखित झाली.

नगराध्यक्ष सचिन सातव आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी नागरिकांची गैरसोय कमीत कमी व्हावी, यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधल्याचे सांगितले. नैसर्गिक संकट कितीही मोठे असले, तरी तत्पर प्रशासन आणि योग्य समन्वयातून परिस्थिती नियंत्रणात आणता येते, याचा प्रत्यय बारामतीकरांना आला.

एका रात्रीत १५८ मिमी पावसाचे संकट आले, शहर जलमय झाले; मात्र अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने केलेली धडाकेबाज कामगिरी चर्चेचा विषय ठरली.

संकट कितीही मोठे असो, अजितदादांची बारामती थांबणार नाही!

Back to top button