इंदापूर

इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत २६ विषयांना मंजुरी

नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न

इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत २६ विषयांना मंजुरी

नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न

इंदापूर : प्रतिनिधी
अनुकंपातत्व व वारसाहक्काने नगरपरिषदेत नोकरी मिळावी यासाठी नगरपरिषदेसमोर उपोषणाला बसलेल्या नगरपरिषदेच्या मयत कर्मचा-यांच्या वारसांना नोकरी मिळवून देण्यासाठी,शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा करण्याच्या निर्णयासह एकूण २६ विषयांना नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या नवीन कार्यालयातील छत्रपती शिवाजीराजे सभागृहात सभा पार पडली.

नगरपरिषदेच्या नवीन इमारतीजवळ दीड कोटी रुपये खर्च करून शहरातील नागरिक, तालुक्यातील युवक,युवती व शालेय विद्यार्थ्यांना योग शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योगभवनाच्या कामांना मंजूरी देण्यात आली.नगरपरिषद हद्दीतील अनेक बांधकामे, भोगवटा दाखला नसल्यामुळे अनधिकृत ठरवलेली आहेत.या मालमत्ता धारकांना दरवर्षी शास्ती भरावी लागते.भोगवटा दाखला नसल्याने बँका कर्ज देत नाहीत.अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.ही शास्ती शासनस्तरावर माफ करून मिळावी,बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात ठराव मंजूर झाला.दि.१ जानेवारी २०१६ रोजी नगरपरिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे.स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत पुढील कार्यकाळात हगणदारीमुक्त इंदापूर शहर व पंचतारांकित मानांकन मिळविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.

शहरात चिकनगुनिया,डेंग्यू सदृश्य साथीच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे,याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आरोग्य विभागाला तातडीने शहरात स्वच्छता करण्यात यावी.औषध फवारणी करावी अशी सूचना केली.इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीस विरश्री मालोजीराजे भोसले भवन नाव द्यावे. छत्रपती शिवाजीराजे सभागृहात शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प अथवा थ्रीडी अद्यावत तंत्रज्ञानातील छायाचित्र बसवावे अशी सूचना यावेळी मांढण्यात आली.

कोरोना काळात हजारो नागरिकांना जीवदान देणारे अकलूज येथील प्रसिध्द डॉक्टर एम.के इनामदार यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्याचा विषय या सभेत सर्वानुमते संमत झाला.

यावेळी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,भरत शहा,विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते गजानन गवळी,अनिकेत वाघ,राजश्री मखरे यांच्यासह सर्व नगरसेवक सभेला उपस्थित होते.सभा अधीक्षक म्हणून गजानन पुंडे यांनी कामकाज पार पाडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram