स्थानिक

बारामतीतील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत शक्ती पथकाचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनुचित प्रकाराला बळी न पडता योग्य वेळी पोलिसांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा

बारामतीतील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत शक्ती पथकाचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनुचित प्रकाराला बळी न पडता योग्य वेळी पोलिसांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा

बारामती वार्तापत्र

रयत शिक्षण संस्थेच्या आर. एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि कायदेशीर हक्कांची माहिती देण्यासाठी शक्ती पथकाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात शक्ती पथकाच्या प्रमुख पोलिस कॉन्स्टेबल वनिता कदम यांनी विद्यार्थ्यांना महिला व बालकांच्या सुरक्षेसंबंधी कायदे, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, छेडछाड व अत्याचाराच्या घटनांमध्ये तात्काळ तक्रार करण्याचे महत्त्व तसेच आत्मविश्वासाने व निर्भयपणे वावरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनुचित प्रकाराला बळी न पडता योग्य वेळी पोलिसांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री सतीश पाचपुते यांनी विद्यार्थी शिस्त ,सोशल मीडिया आणि त्यामुळे विद्यार्थ्यावर होणारे परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शक्ती पथकातील पोलिस कॉन्स्टेबल शंकर निंबाळकर,संतोष वीरकर पर्यवेक्षिका सौ.अलका चौधर ,प्रभारी प्राचार्य श्री सतीश पाचपुते तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अरविंद मोहिते यांनी केले.

Back to top button