उजनी धरणातील पुलाच्या कामावर आक्षेप
शिरसोडीत भराव न घालता नदीच्या कडेपर्यंत पूल बांधण्याची मागणी

उजनी धरणातील पुलाच्या कामावर आक्षेप
शिरसोडीत भराव न घालता नदीच्या कडेपर्यंत पूल बांधण्याची मागणी
इंदापूर प्रतिनिधी –
पुणे जिल्ह्यातील इंदापूर व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या सीमेवर उजनी धरण पाणलोट परिसर आहे. करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी, कुगाव ते कालठण नंबर २ चिखलठाण ते पडस्थळ, अशी जलमार्गे वाहतूक होडीतून सुरू आहे. मात्र, ती जीवघेणी प्रवासी वाहतूक आहे. याबाबत उजनी धरण पाणलोट परिसरात पूल करण्याची वारंवार मागणी होत होती. त्यानुसार सध्या यापुलाचे काम जोमात सुरू आहे. यामध्ये केवल सपोर्टेड पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे बांधकाम आणि इतर कामे करण्यात येणार आहेत. मात्र, सध्या इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील या पुलाचे काम वादाच्या भवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
या पुलाचे काम शिरसोडी हद्दीपर्यंत होताना नदीपात्रात सुमारे ४०० ते ५०० मीटर भराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रात शिरसोडी गावच्या हद्दीतील शेतकऱ्यांना नदीच्या पात्रात जागे येणेअवघड होणार आहे. तसेच, जनावरे चारण्यासाठी किंवा शेतीला पाणी आणण्यासाठी कायमची अडचणहोणार आहे. ती होऊ नये यासाठी भराव न टाकता नदीच्या कडेपर्यंत पूल बांधावा, अशी मागणी स्थानिकशेतकऱ्यांमधून करण्यात आली आहे. शासनाने या मागणीचा विचार केला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिली आहे.
यावेळी तुळशीराम चोरमले, राजेंद्र चोरमले, भारत चोरमले, सतू चोरमले, शिवाजी चोरमले, राघू चोरमले, सुरेश चोरमले, जयराम चोरमले, हरिदास चोरमले, संतोष चोरमले यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आमचा पुलाच्या कामाला विरोध नसून, भरावाच्या कामाला विरोध आहे. भराव कमी करून शेवटच्या टोकापर्यंत पूल उभारण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. उजनी धरणाच्या निर्मितीवेळी आमच्या जमिनी गेल्या, मात्र आता पुन्हा आमचे नुकसान
-तुळशीराम चोरमले,धरणग्रस्त शेतकरी
शिरसोडी बाजूकडे साधारणपणे ४५० मीटर भरावाचे नियोजन आहे. ●● शिरसोडीतील शेतकऱ्याच्या दृटिकोनातून हा भरावा पूर्णपणे अडचणीचा होणार आहे. कारण, या भरावामुळे येथील शेतकऱ्याना नदीता जाता येणार नाही. जनावरे, शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी अडचणी येणार आहेत. रस्त्याचा भरावा ही शेतकऱ्याची कायमची अडचण ठरणार आहे. त्यामुळे येथे भराव न करता नदीच्या कडेपर्यंत पूल बांधून रस्ता करावा.
राजेंद्र चोरमले, धरणग्रस्त शेतकरी