क्राईम रिपोर्ट

तू मला खूप आवडतेस, तू जर नाही म्हणाली तर…; बारामतीमध्ये तरुणीचा विनयभंग

तुझ्याविषयी काही भावना नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं.

तू मला खूप आवडतेस, तू जर नाही म्हणाली तर…; बारामतीमध्ये तरुणीचा विनयभंग

तुझ्याविषयी काही भावना नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं.

बारामती वार्तापत्र 

‘तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू मला होकार दे, तू जर नाही म्हणालीस तर मी फाशी घेईन,’ असं म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यातील बारामतीत घडली आहे.

या प्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आदित्य साळुंके (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीने नमूद केल्यानुसार २२ जानेवारी ते २६ एप्रिल या कालावधीत सोमेश्वरनगरमधील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. फिर्यादी तरुणी महाविद्यालयात अभ्यास करत असताना आदित्य साळुंके याने तिच्याजवळ जात तिच्याकडे वाईट भावनेनं पाहिलं. ‘तू मला होकार दे,’ असं म्हणून त्याने फिर्यादीला त्रास दिला. ‘तू नाही म्हणालीस, तर मी फाशी घेईन,’ असं सांगत फिर्यादीला ब्लॅकमेल केलं.

तरुणीने त्याला ‘माझ्या मागे मागे येऊ नकोस, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, माझ्या मनात तुझ्याविषयी काही भावना नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं. तरीही त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्याच्या भावाला बोलावून घेते असं सांगितले. शिवाय ती दप्तर घेऊन बाहेर पडत असतानाही त्याने तिला जिन्यात अडवले. ‘तू माझ्या घरच्यांना याबाबत काही सांगितलं तर मी फाशी घेईन,’ अशी धमकीही त्याने दिली.

त्यामुळे तरुणीने तिच्या घरी हा प्रकार सांगितला आणि पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडालीये. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण मुलीला त्रास देत होता. हेच नाही तर तिने सांगूनही तो तिच्या मागे मागे जात होता. त्याने फाशी घेण्याची धमकी दिल्यानंतर तरुणीने घडलेला सर्व प्रकार हा तिच्या घरी सांगितला. यानंतर पोलिसांनी विनभंगाचा गुन्हाही दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!