स्थानिक

दिव्यांग असून सुद्धा वरदा चे जलतरण मध्ये उल्लेखनीय यश

जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने

दिव्यांग असून सुद्धा वरदा चे जलतरण मध्ये उल्लेखनीय यश

जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने

बारामती वार्तापत्र

जिद्द चिकाटी आत्मविश्वास व आई-वडिलांची साथ या जोरावर दिव्यांग असून सुद्धा वरदा कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी ने जलतरण क्षेत्रामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बारामती येथील दीव्यांग विद्यार्थीनी कुमारी वरदा संतोष कुलकर्णी .

वरदा (inilectual disabilty ) दिव्यांग आहे. परंतू तिने जलतरण स्पर्धेत मध्ये बारामती चे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकविले आहे. वयाच्या १० व्या वर्षापासून तिने पोहणे चालू केले आज रोजी तिने सर्व स्विमिंग प्रकारात (फ्री स्टाईल, बटर फ्लाय,रिव्हर्स व ५० ,१०० मीटर ) तसेच समुद्र जलतरण मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

ही बाब उल्लेखनीय आहे.या साठी रोज ३ तास कसून सराव करणे त्या जोडीला व्यायाम करणे व त्या साठी आवश्यक म्हणजे आहार असणे अतिशय महत्वाचा भाग आहे.

सराव करून घेताना दिव्यांग असल्याने तिच्या कले प्रमाणे ,म्हणण्यानुसार सराव करून घ्यावा लागतो त्या साठी योग्य हातवारे,इशारा करावा लागतो.

तरच तिला समजतात सद्या ती बारामती शहरातील बाल कल्याण केंद्र या ठिकाणी’ प्री व्होकेशनल ‘ लेव्हल चे शिक्षण घेत आहे.वरदा ने आता पर्यंत तालुका, जिल्हा,राज्य व देश पातळीवर विविध स्पर्धेमध्ये पदके मिळवलेली आहेत शिक्षण घेत उर्वरित वेळेत फक्त जलतरण स्पर्धा साठी सराव साठी करणे व येणाऱ्या काळात जागतिक स्तरावर दिव्यांगासाठी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणे हे तिचे ध्येय आहे. त्या साठी आर्यनमॅन ओम सावळेपाटील यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहे.

वरदा कुलकर्णी हिचे आई वडील शिक्षक आहेत सामान्य परिस्थिती आहे दोन्ही मुली आहेत त्यापैकी वरदा दिव्यांग आहे तरीही न खचता वरदा ला वेळ देणे व तिला राष्ट्रीय स्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन करण्यासाठी भरपूर कष्ट घेत आहेत ही बाब आदर्शवत आहे.

चौकट

वरदा दिव्यांग असून सुद्धा सामान्य व इतर मुली पेक्षा अभ्यास व जलतरण मध्ये बुद्धिमान आहे फक्त करवून घेण्यासाठी कष्ट पडतात परंतु जिद्दी आहे एक दिवस दिव्यांग असून सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव रोशन करील: संतोष कुलकर्णी वरदा चे वडील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!