पुणे

देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात; उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती

वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात; उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती

वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देहू : प्रतिनिधि

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले व भाविक वारकऱ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे स्मरण करत, वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, भक्तीची आणि सामाजिक ऐक्याची महान परंपरा असल्याचे सांगितले. तसेच वारकऱ्यांच्या सुविधा, सुरक्षितता आणि आवश्यक सर्व व्यवस्था प्रशासनामार्फत प्रभावीपणे करण्यात आल्याची माहितीही यावेळी घेण्यात आली.

या सोहळ्यास विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, मंदिर संस्थानचे पदाधिकारी तसेच हजारो वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D