“आमचा संयम सुटत चालला आहे, त्या दिवशी नेमकं काय घडलं याचं उत्तर द्या” – युगेंद्र पवार
"सहा महिने आम्ही संयम ठेवला.

“आमचा संयम सुटत चालला आहे, त्या दिवशी नेमकं काय घडलं याचं उत्तर द्या” – युगेंद्र पवार
“सहा महिने आम्ही संयम ठेवला.
बारामती वार्तापत्र
दिवंगत अजितदादांच्या निधनाला सहा महिने पूर्ण होऊनही अद्याप चौकशीचा अंतिम अहवाल समोर आलेला नसल्याबद्दल युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आमचा संयम सुटत चालला आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं, याचं स्पष्ट उत्तर आम्हाला हवं आहे,” अशी मागणी त्यांनी केली.
युगेंद्र पवार म्हणाले, “दादांना जाऊन सहा महिने झाले, पण अजून काहीच झालेलं नाही, याची खंत आहे. लोक अजूनही ‘अजितदादा सोडून गेले’ असं बोलून दाखवतात; मात्र त्यानंतर ठोस कारवाई किंवा निष्कर्ष काहीच समोर आलेला नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “साधे सीसीटीव्ही फुटेजही अजून उपलब्ध झालेले नाही.
सीआयडी आणि डीजीसीए चौकशी करत आहेत, पण अद्याप कोणताही ठोस अहवाल समोर आलेला नाही. व्हीएसआरच्या मालकावरही कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा चौकशी पूर्ण झालेली नाही.”
“सहा महिने आम्ही संयम ठेवला. आता दुसरा अहवाल समोर यायला हवा. आम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
युगेंद्र पवार यांनी पुढे सांगितले की, “साहेबांना देशाचा मोठा अनुभव आहे. ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर कारवाई झाली, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही झाला. आता या प्रकरणातही योग्य ती कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”







