“ऊस माळेगावलाच!” मोरोचीतील शेतकऱ्यांचा ठाम निर्णय; ५० हजार टनांचा शब्द
सुनेत्रा पवारांच्या सूचनेनुसार गावागावात संवाद

“ऊस माळेगावलाच!” मोरोचीतील शेतकऱ्यांचा ठाम निर्णय; ५० हजार टनांचा शब्द
सुनेत्रा पवारांच्या सूचनेनुसार गावागावात संवाद
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गेटकेन ऊस उत्पादकांशी थेट संवाद साधण्यासाठी कारखान्याच्या वतीने सुरू असलेल्या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार फलटण तालुक्यातील विडणी-पिंपरद तसेच माळशिरस तालुक्यातील मोरोची येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
विडणी-पिंपरद येथे गेटकेन ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि शंकांवर चर्चा करण्यात आली. जागेवरच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आल्याने माळेगाव कारखान्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
यानंतर माळशिरस तालुक्यातील मोरोची गावात शेतकरी संवाद साधण्यात आला. यावेळी गावातून तब्बल ५० हजार टन ऊस माळेगाव सहकारी साखर कारखान्याला देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या गेटकेन ऊस संकलनाला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद देण्याच्या या उपक्रमामुळे माळेगाव कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी माळेगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शेंडे, संचालक जयपाल देवकाते, गणेश खलाटे, राजेंद्र बुरूंगले, रतनकुमार भोसले, सतीश फाळके, विशाल जगताप, शेतकी अधिकारी लिंभोरे साहेब तसेच ओव्हरसिअर अनिल जगताप यांच्यासह संबंधित पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







