पडद्यामागं नेमकं काय घडतंय?, जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला बारामतीत, सुप्रिया सुळेही उपस्थित…
जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याची चर्चा?

पडद्यामागं नेमकं काय घडतंय?, जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला बारामतीत, सुप्रिया सुळेही उपस्थित…
जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याची चर्चा?
बारामती वार्तापत्र
राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
त्यातच आज जयंत पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये दाखल झाले. त्यामुळे चर्चांना उधाण आले.
राष्ट्रवादीत 2023मध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटीलांनी मात्र शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी जयंत पाटलांकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवलं. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदारही निवडून आले.
मात्र विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारली. तर शरद पवारांच्या पक्षाचं पानिपत झालं. त्यातच जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याची चर्चा सुरू आहे.
जयंत पाटील बारामतीत दाखल, पवारांना भेटले…
राजकीय चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे जयंत पाटील आज बारामतीमध्ये दाखल झाले. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राला जयंत पाटील यांनी शरद पवारांसह भेट दिली.
बारामती मध्ये कृषी विज्ञान केंद्रास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भेट दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी शरद पवार जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत करण्यात आलेल्या नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान व पीक पद्धतीची माहिती घेतली.
पीक पद्धतीची माहिती घेतली, पण राजकीय पेरणी?
कृषी विज्ञान केंद्रात शरद पवारांसोबत जयंत पाटील यांनी भेट दिली. पीक पद्धतीची माहिती घेता घेता जयंत पाटील आणि पवारांनी राजकीय पेरणी केली का, याची चर्चा रंगली आहे. जयंत पवार यांनी याआधीच राष्ट्रवादी सोडून जाण्याच्या फेटाळल्या आहेत.