
प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ प्रदान
७६ वा वर्धापन दिन
बारामती वार्तापत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामतीचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
अव्यावसायिक अभ्यासक्रम ग्रामीण विभागासाठी दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र देऊन डॉ. भरत शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थी विकास, संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासन आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
वर्धापन दिनाचा गौरवशाली सोहळा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये, प्राचार्य, संशोधक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या सोहळ्यास व्यासपीठावर विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. संदीप पालवे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. संगीता जगताप तसेच सौ. उज्ज्वला भरत शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्रतिनिधींची उपस्थिती
पुरस्कार सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. हणमंतराव पाटील, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. जयश्री बागवडे, डॉ. मनिषा खुटवड, डॉ. मंगल ससाने, डॉ. संजय खिलारे, डॉ. श्रीराम गडकर, डॉ. सुनील ओगले, डॉ. राहूल तोडमल, डॉ. कोळपकर तसेच ग्रंथपाल डॉ. अलका जगताप, विजय काकडे, राजेंद्र वळवी, तुषार जगताप, सदानंद पवार आणि अरविंद मोकाशी व शिंदे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
डॉ. भरत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील यशस्वी वाटचाल
डॉ. भरत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवले आहेत.
त्यांनी महाविद्यालयात संशोधन, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी विकास,कौशल्याधारित शिक्षण आणि शिस्तबद्ध प्रशासन यावर भर दिला आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.