बारामतीतील मएसोच्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रयोगशाळेचे नूतनीकरण
माजी विद्यार्थ्यांकडून नूतनीकरण केलेल्या प्रयोगशाळेचा समर्पण सोहळा व स्नेहमेळावा संपन्न

बारामतीतील मएसोच्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रयोगशाळेचे नूतनीकरण
माजी विद्यार्थ्यांकडून नूतनीकरण केलेल्या प्रयोगशाळेचा समर्पण सोहळा व स्नेहमेळावा संपन्न
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक विद्यालयात १९८८ सालच्या माजी विद्यार्थ्यांकडून नूतनीकरण केलेल्या प्रयोगशाळेचा समर्पण सोहळा व स्नेह मेळावा रविवार दिनांक १६ फेब्रु. रोजी पार पडला .
या नूतनीकरण केलेल्या प्रयोगशाळेचा समर्पण सोहळा प्रमुख पाहुणे मा.जवाहरशेठ वाघोलीकर व मा. ॲड. अशोक प्रभुणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष अजयजी पुरोहित,प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, सल्लागार समिती सदस्य राजीवजी देशपांडे, फनेंद्र गुजर व शाला समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड, या बॅचला शिकविणारे माजी शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थी व त्यांना शिकवणारे शिक्षक जुन्या आठवणीत रमले. अनेक वर्षांनी एकत्र आल्यानंतर सर्वांची भेट झाली, सर्वांच्या चेहऱ्यावरती या भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृशाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत आर्थिक योगदानातून विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळेचे संपूर्ण नूतनीकरण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अजय पुरोहित यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, शाळेविषयी दाखवलेल्या प्रेमाबद्दल कौतुकही केले.
माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येवून चार लाख रुपये खर्च करून अद्ययावत अशी प्रयोगशाळा तयार केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी आपल्या मनोगतात माजी विद्यार्थ्यांना ज्या ज्या वेळी आवाहन केले त्या त्या वेळी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन शाळेला मदत केली त्याबद्दल त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले .
यावेळी माजी शिक्षकांनीही मनोगते व्यक्त केली. त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक राजाराम गावडे , पर्यवेक्षक शेखर जाधव , दिलीप पाटील, जयश्री शिंदे , या बॅचचे समन्वयक संजय आटोळे व सविता सनगर , प्रयोगशाळा परिचर साईराज खेडकर, सागर फुले तसेच माजी विद्यार्थी , शिक्षक वृंद , सेवकवर्ग उपस्थित होते. या प्रयोगशाळेच्या नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थी डॉक्टर. संगीता गायकवाड स्वप्निल शहा , राजेंद्र कदम, अभय दुगड , इंजिनिअर श्रीकांत अनपट, सोनिक शहा , सुजित पराडकर , अमित पराडकर, महेश पाठक , किशोरी भोयरेकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे .
या बॅचचे या मेळाव्याचे आयोजन सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सनगर व उज्वला बनकर यांनी केले व आभार नजीमुद्दीन खाईमी यांनी मानले .