बारामतीतील महावीर भवन या ठिकाणी ११ ते १३ एप्रिल दरम्यान धान्य महोत्सवाचे आयोजन
सकाळी 9 ते रात्री 8.30 या वेळेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार

बारामतीतील महावीर भवन या ठिकाणी ११ ते १३ एप्रिल दरम्यान धान्य महोत्सवाचे आयोजन
सकाळी 9 ते रात्री 8.30 या वेळेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार
बारामती वार्तापत्र
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि शारदा महिला संघ यांच्या मार्फत महावीर भवन, तीनहत्ती चौक, कॅनोल रोड येथे ११ ते १३ एप्रिल दरम्यान धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे यावर्षीचा हा दहावा धान्य महोत्सव आहे.
घरगुती वापरासाठी वर्षभर लागणारे गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य, डाळी, बाजरी, काजू, बदाम, हळद, मशरूम, भरड धान्य व त्याचे प्रक्रिया पदार्थ, दुधाचे प्रक्रिया पदार्थ इत्यादी शेतातून थेट आपल्यापर्यंत शेतकऱ्यांकडून खरेदीची सुवर्णसंधी या महोत्सवात नागरिकांना मिळते व त्याला प्रतिसाद देखील उत्तम असतो या दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8.30 या वेळेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे.
गहू – (एचडी 2189 ,लोकवत, खपली आणि त्र्यंबक) तांदूळ -भोर, वेल्हा, जुन्नर, रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा (इंद्रायणी, रत्नागिरी 24 आणि काळा भात) ज्वारी- (मालदांडी दगडी, रेवती आणि वसुधा) भरडधान्य- (नाचणी, वरई तांदूळ बाजरी, राळा, सावा इ. व त्याचे प्रक्रिया पदार्थ) या व्यतिरिक्त कडधान्य- (मटकी, चवळी, हुलगा, तूर डाळी, हरभरा ) तसेच घाण्याचे तेल, हापूस आंबा, अंजीर, बेदाणे , कोकम, नीरा, मध, गुळ, चिंच, ओली हळद, विविध प्रकारचे मसाले,चटण्या, उन्हाळी पदार्थ आणि मातीची भांडी इ. एकाच छताखाली या सर्व जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याने आपण त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र तर्फे करण्यात आले आहे.
हा धान्य महोत्सव संस्थेचे चेअरमन मा.श्री.राजेंद्र पवार व विश्वस्त मा.सौ.सुनंदाताई पवार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.