
बारामती नगरपरिषद समोर अपघातात मोतीलाल दोशी यांचा मृत्यू
पघात मुळे नागरिक भयभीत
बारामती:वार्तापत्र
मोतीलाल उत्तमचंद दोशी वय ८२(राहणार सुभाष चौक बारामती) हे सकाळी ६:३० च्या दरम्यान व्यायाम करण्यासाठी चालत असताना बारामती नगर परिषद समोरून भिगवन रस्ता इकडे जात असताना भरधाव वेगाने येणारी बस (MH 01 L 7309) ने धडक दिली व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अशी बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे.
बस चालक सुनील पांडुरंग शेंडगे वय ३९ त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस हवालदार टापरे करीत आहेत
पहाटे झालेल्या सदर अपघात मुळे नागरिक भयभीत झाले असून भरधाव वेगाने चालवत असलेल्या वाहन चालकावर वाहन मालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे