बारामती मध्ये तिथीनुसार होणार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
शिवजयंती उत्सव समिती बारामती ४१ व्या वर्षी

बारामती मध्ये तिथीनुसार होणार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
शिवजयंती उत्सव समिती बारामती ४१ व्या वर्षी
बारामती वार्तापत्र
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३९५ जयंती फाल्गुन कृ चतुर्थी शके १४४६ दिनांक १७ मार्च २०२५ वार सोमवार वेळ सकाळी साडेनऊ वाजता सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सकाळी कसबा येथील उद्यान मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे
शिवजयंती उत्सव समिती बारामती ४१ व्या वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे भव्य अशी मिरवणूक समितीच्या वतीने सायंकाळी ६ वा. उद्यान कसबा बारामती येथून गुणवडी चौक गांधी चौक भिगवन चौक अहिल्यादेवी चौक या मार्गे होणार आहे .
या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण भव्य असा मूर्तीसहरथ, महाराजांची पालखी,रुद्रावतार पुणे ढोल पथक, मर्दानी खेळ, हलगी नृत्य, गोंधळी नृत्य संभळ नृत्य, रणमर्दानी पोशाखातील मावळे, घोडे उंट, बालशिवाजी तुतारीवादक, सुरसनई वाद्य, पोतराज, हलगी पथक, पारंपारिक वेशभूषातील मावळे, भगवे फेटे, टोपी, झेंडे इत्यादी सह हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत ३८ शिवभक्त मंडळे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे स्वागत करणार असून सर्व बारामती मधील नागरिकांनी या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान शिवजयंती उत्सव समिती बारामतीचे वतीने करण्यात येत आहे.