मुंबई

काही दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती.

काही दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती.

प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती बाबत माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि स्नायूंच्या दुखापतीचा त्रास वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना हा त्रास होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता

मागील अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षाबंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणेदेखील टाळले होते. सध्या ठाकरे यांचा हा त्रास कमी होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत आहे. यामुळे त्यांनी दिवाळीमध्ये देखील अनेक भेटी टाळल्या होत्या. आता पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्या केल्या असल्याची माहितीही पुढे आली आहे.

Related Articles

Back to top button