महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं पवार-शाह गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु 

सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसून आता घालमेल बाहेर येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं पवार-शाह गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु

सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसून आता घालमेल बाहेर येत आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत असतानाच आता शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान ही भेट अमित शाह आणि शरद पवार यांच्यात झाल्याचं बोललं जात आहे. अमित शाह आणि शरद पवार यांच्या गुजरात मधल्या गुप्त भेटीबद्दल उलट-सुलट चर्चा होत असतानाच याबाबत स्वतः अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. याबाबत अमित शाह यांना पत्रकार परिषदेत शरद पवारांसोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न विचारला असता शाह यांनी ‘सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत’ असं म्हणत सूचक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी भेट झाल्याचं नाकारलं नाही.

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी गुजरातमध्ये नेमकी कुणाची गुप्त भेट घेतली? अमित शाह की गौतम अदानी? महाराष्ट्राच्या राजकारणात अँटिलिया- वाझे प्रकरणावरुन गदारोळ सुरु असताना शरद पवारांची पावलं गुजरातकडे का वळाली? या प्रश्नांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय. दैनिक भास्करच्या गुजराती आवृत्तीनं तर पवारांची ही भेट अमित शाहांसोबतच होती असा दावा केला आहे.

संसदेचं अधिवेशन गुरुवारी गुंडाळलं गेलं. त्यानंतर शुक्रवार सकाळपर्यंत शरद पवार दिल्लीतच होते. तिथून ते पहिल्यांदा जयपूरला गेले. तिथे जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. आणि नंतर जयपूरहून अहमदाबादला. शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी साडेदहापर्यंत शरद पवार अहमदाबादमध्ये होते, अशी माहिती मिळतेय. योगायोग म्हणजे याच दिवशी अमित शाहसुद्धा अहमदाबादमध्ये होते.

ही भेट गुप्त राहावी यासाठी ती अहमदाबादच्या शांतीग्राम गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. भेटीबाबत दोन थेअरी मांडल्या जात आहेत. एक थेअरी अशी की ही भेट गौतम अदानींसोबत होती. तर दुसरी चर्चा ही भेट अमित शाहांसोबत होती. पण अशा काही भेटी झाल्याचं अधिकृतपणे अद्याप तरी कुणी मान्य करायला तयार नाहीय.

किंबहुना अमित शाहांच्या कार्यशैलीबद्दलची शरद पवारांची नाराजी जाहीर मुलाखतींमधून प्रकट झालेली आहे. हे सगळं लक्षात घेता जर पवार शाहांना भेटले असतील तर त्याचं महत्व अधिक वाढतं. अशी काय मजबुरी आली की शरद पवारांना अमित शाहांची भेट घ्यावी लागली, हा प्रश्न त्यातून निर्माण होतो.

राजकारणात एखाद्या भेटीनं लगेच नवी समीकरणंच मांडली जातील असं नाही.पण एखाद्या राजकीय नात्यात आईसब्रेकर म्हणून अशा मुलाखती महत्वाच्या ठरतात. त्यामुळे लगेच एका भेटीनं राजकीय भूकंप घडेलच असं नाही. पण अशा घडामोडींत भविष्यातल्या हालचालींचा वेध असतो.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या वेळी सुद्धा भाजप-राष्ट्रवादीच्या गुप्त भेटींची चर्चा रंगली होती. आता महाविकास आघाडी एका संकटातून जात असतानच पुन्हा अशा भेटींची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात व्हाया गुजरात काही नवी समीकरणं दिसतात की शरद पवारांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे अशा भेटींमधून ते फक्त चकवा, हूल देऊ इच्छितात हे लवकरच कळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!