महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य,बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल
विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी
महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य,बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल
विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी
प्रतिनिधी
बंडातात्या कराडकर यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी जाहीरपणे दिलगीरी व्यक्त केलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाहीये. महिला आयोगाने त्यांच्याकडे खुलासा मागवला आहे. तसेच बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी कलम 269, 270, 188, 37(1)(3) 135 नुसार हा गुन्हा दाखल.
बंडातात्या कराडकर चर्चेत का आले ?
बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध केला. तसेच त्यांनी वाईन आणि दारुविषयी बोलताना राज्यातील महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यामुळे राज्यात वादंग माजले आहे.
बंडातात्या कराडकर यांचा माफिनामा
काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे ‘दंडवत आणि दंडूका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला होता. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता.