स्थानिक

रवीकुमार काळे यांना सायकॉलॉजी मध्ये डॉक्टर पदवी प्रदान

मानवी जीवन व मानसिक आरोग्य या विषयावर त्यांनी शोध निबंध सादर केला होता.

रवीकुमार काळे यांना सायकॉलॉजी मध्ये डॉक्टर पदवी प्रदान

मानवी जीवन व मानसिक आरोग्य या विषयावर त्यांनी शोध निबंध सादर केला होता.

बारामती वार्तापत्र

२७ एप्रिल २०२५ रोजी अयोध्येतील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठात आज झालेल्या विशेष समारंभात रविकुमार काळे यांना सायकॉलॉजी या क्षेत्रात “डॉक्टररेट”पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या हिप्नोथेरपी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना हा सन्मान दिला आहे.

मानवी जीवन व मानसिक आरोग्य या विषयावर त्यांनी शोध निबंध सादर केला होता.

मानसिक आरोग्य आणि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा यावेळी विद्यापीठ प्रशासनाने केली. यावेळी मुख्य अतिथी पुर्व कुलपति रानी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झांशी पद्मश्री डाॅ.अरविंद कुमार,कुलपति प.दिनदयाल उपाध्याय हिंदी विध्यापीठ अध्यक्षता डाॅ. इन्दु भुषण मिश्रा,सुप्रसिध्द कथा वाचिका वृन्दावन धाम मथुरा मुख्य वक्ता सुश्री दिपा मिश्रा,राष्ट्रीय पर्यावरणविद आणि वर्ड रेकाॅड धारी बागबहरा जिल्हा महासमुंद(छत्तीसगढ) विशिष्ट अतिथि डाॅ.विश्वनाथ पाणिग्रहि या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पदवी प्रधान करण्यात आली.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल
अस्मिता हिप्नॉथेरपी चे मुख्य अधिष्ठाता प्रा विजयकुमार काळे, मानसशास्त्र चे विभाग प्रमुख मनोज शिंदे ,प्रा यश सातपुते व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.प्रा शैलेश भिसे यांनी सदर शोध निबंध साठी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!