सतगुरु माताजींच्या पावन सान्निध्यात भक्तिभावनेने भक्तीपर्व समागम संपन्न
बारामतीसह सातारा झोनमध्ये 13 ठिकाणी आयोजन

सतगुरु माताजींच्या पावन सान्निध्यात भक्तिभावनेने भक्तीपर्व समागम संपन्न
बारामतीसह सातारा झोनमध्ये 13 ठिकाणी आयोजन
बारामती वार्तापत्र
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात रविवारी (ता. 12) भक्ती पर्वाचे आयोजन करण्यात आले. भक्ती पर्व संत समागमाचा मुख्य कार्यक्रम सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे संपन्न झाला.
भक्तीपर्वाच्या निमित्ताने बारामती खंडोबानगर येथील सत्संग भवनात निरंकारी मिशनच्या बारामती शाखेसह मोरगाव, शेटफळ गढे, मदनवाडी या शाखाच्या वतीने विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा समागम बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
समालखा येथील भक्तीपर्व संत समागमामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना प्रतिपादन केले, की “भक्ती अशी अवस्था आहे जी जीवनाला दिव्यत्व आणि आनंदाने ओतप्रोत करते. हा इच्छापुर्तीचा सौदा नाही किंवा स्वार्थाचे माध्यमही नाही. खऱ्या भक्तीचा अर्थ आहे परमात्म्याशी गहिरे नाते आणि निःस्वार्थ प्रेम।”
या शुभ प्रसंगी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात श्रद्धा व भक्तिची अनुपम छटा पहायला मिळाली.
या प्रसंगी महान संत सन्तोखसिंहजी यांच्यासह अनेक संतांच्या तप, त्याग आणि ब्रह्मज्ञानाच्या प्रचार-प्रसारामधील त्यांच्या अमूल्य योगदानांचे स्मरण केले गेले आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यात आली.
सतगुरु माताजींनी भक्तीचा महिमा वर्णन करताना सांगितले, की ब्रह्मज्ञान हा भक्तीचा आधार आहे ज्यायोगे जीवन एक उत्सव बनून जाते. भक्तीचे वास्तविक स्वरूप दिखाव्याच्या पलीकडे आणि स्वार्थ व लालसा यांपासून मुक्त असायला हवे.
.