सोमय्या पिता-पूत्र पळून तर कुठे पळून गेले नाहीत? शिवसेना खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप
न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत.
सोमय्या पिता-पूत्र पळून तर कुठे पळून गेले नाहीत? शिवसेना खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप
न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत.
मुंबई :प्रतिनिधी
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. INS विक्रांतच्या नावावर जो घोटाळा झाला आहे. हा छोटा घोटाळा नसून त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. किरीट सोमय्या त्यांचा मुलगा निल सोमय्या आणि त्यांच्या माफिया टोळीने संपूर्ण महाराष्ट्रबरोबरच देश-विदेशातून पैसा गोळा केला. ही माफिया गँग बिल्डरांकडूनही पैसे गोळा करते, असा आरोप केला आहे.
किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्यासह फरार झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत? असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला.
दरम्यान, किरीट सोमय्या फरार असल्याचा आरोप झाल्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे मदतीला धावून आले आहे. ‘सोमय्या पिता-पुत्र यांनी पळून जायचं काही कारण नाही त्यांनी अटकपूर्व जामीन केला आहे. आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्णविश्वास आहे. त्यांना योग्य न्याय मिळेल, असं दरेकर म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल म्हणजेच, आज सुनावणी पार पडणार आहे.
ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणालेत संजय राऊत
किरीट सोमय्या हे मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली तरी सत्याचाच विजय होईल असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आता राऊतांच्या या वक्तव्यावर सोमय्या काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.