उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओच्या दोन थेंबांपासून वंचित राहू देऊ नका

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओच्या दोन थेंबांपासून वंचित राहू देऊ नका
बारामती वार्तापत्र
देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने रविवारी देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येत आहेत.
बारामतीतील अहिल्यादेवी शासकीय रुग्णालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात केली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओची लस देण्याचे आवाहन केले. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्य विभागाच्या वतीने शहर व तालुक्यातील विविध शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच विशेष लसीकरण बूथवर दिवसभर ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांची विशेष पथके कार्यरत होती.
सुनेत्रा पवार यांनी पालकांना आवाहन केले आहे की, पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओच्या दोन थेंबांपासून वंचित राहू देऊ नका, कारण प्रत्येक बालकाचे लसीकरण हे पोलिओमुक्त भारत कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.






