बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात २४ नगरसेवकांचे निवेदन; सभेतील भूमिकेची नोंद करण्याची मागणी
७७ पैकी ४० विषयांमध्ये हरकती

बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात २४ नगरसेवकांचे निवेदन; सभेतील भूमिकेची नोंद करण्याची मागणी
७७ पैकी ४० विषयांमध्ये हरकती
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर २४ नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून सभागृहातील त्यांच्या भूमिकेची अधिकृत इतिवृत्तात नोंद करण्याची मागणी केली आहे. संबंधित विषयावर सभेत आपले मत मांडण्यात आले होते, मात्र त्याची नोंद इतिवृत्तात झालेली नसल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे.
निवेदनानुसार, नगरपरिषदेच्या २३ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ५ संदर्भात काही सदस्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ही भूमिका अधिकृत नोंदीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सभागृहातील चर्चेचे वास्तव प्रतिबिंब इतिवृत्तात दिसावे, यासाठी संबंधित सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे आपले मत पुन्हा नोंदविले आहे.
सभागृहात मागील सभेचे इतिवृत्त कायम करताना ७७ पैकी ४० विषयांमध्ये हरकती नोंदवल्या या निवेदनावर तब्बल २४ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असून, सभागृहातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि सदस्यांची भूमिका अधिकृतपणे नोंदविण्यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे समजते.
नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू असून, संबंधित विषयावरील इतिवृत्तात सुधारणा केली जाणार का आणि प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
——–
निवेदानातील इतिवृत्तात सुधारणा विषय क्रमांक
६,९,१०,१२,१३,१५,१६,१७,१८,२०,२१,२२,२३,२४,२६,२८,२९,३०,३१,३४,३६,३८,४१,४२,४४,४५,४६,४७,४९,५०,५१,५४,५५,५७,६२,६३,७७ या विषयांमध्ये सोबत दिलेली नोंदी घेण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
——–
निवेदन देणारे सभागृह सदस्य
विष्णु चौधर, अभिजीत जाधव, अभिजीत चव्हाण, बिरजू माढरे, सविता जाधव, धनश्री बांदल, सुनील सस्ते, जय पाटील, किशोर मासाळ, वनिता सातकर, मनीषा बनकर, संघमित्रा चौधरी, प्रसाद खारतोडे, आरती गव्हाळे, यशपाल पोटे, अनुप्रीत तांबे, संपदा चौधर, शर्मिला ढवाण, रूपाली मलगुंडे, जायसिंग देशमुख ( स्वाक्षरी नाही), दर्शना तांबे, प्रतिभा खरात आफरीन बागवान, नीलेश इंगूले यांनी निवेदनावर सह्या करून ऐतिहासिक पायंडा तयार केला आहे. स्वतः घेतलेल्या निर्णयात स्वतः सहभाग नाही अशी त्यांची भूमिका आहे.







