पत्रकार संघ बारामतीच्या अध्यक्षपदी नवनाथ बोरकर; उपाध्यक्षपदी सागर सस्ते व शिवाजी ताटे यांची बिनविरोध निवड
नावाजलेला संघ म्हणून परिचित

पत्रकार संघ बारामतीच्या अध्यक्षपदी नवनाथ बोरकर; उपाध्यक्षपदी सागर सस्ते व शिवाजी ताटे यांची बिनविरोध निवड
नावाजलेला संघ म्हणून परिचित
बारामती वार्तापत्र
पत्रकार संघ बारामतीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवार (दि. १४ ऑगस्ट) रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, बारामती येथे ही बैठक पार पडली.
या बैठकीत पत्रकार संघ बारामतीच्या अध्यक्षपदी नवनाथ बोरकर, तर उपाध्यक्षपदी सागर (ऊर्फ धनू) सस्ते व शिवाजी ताटे यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी निलेश जाधव, सहसचिवपदी सुरज देवकाते, कार्याध्यक्षपदी सौ. शुभांगी महाडिक, खजिनदारपदी स्वप्निल शिंदे आणि सहखजिनदारपदी प्रशांत कुचेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सुधीर जन्नू, डॉ. विजयकुमार भिसे, सोमनाथ कवडे, तैनूर शेख, दीपक पडकर, दत्तात्रेय महाडिक, राजेश वाघ, मन्सूर शेख, संजय भिसे, संतराम घुमटकर, मल्लिकार्जुन हिरेमठ, कृष्णमूर्ती जगताप आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
पत्रकार संघ बारामती हा पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी कार्यरत असलेला नावाजलेला संघ म्हणून परिचित आहे. पत्रकारांच्या हितासाठी संघाची वाटचाल अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याबरोबरच पत्रकार संघाला महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नवनाथ बोरकर यांनी यावेळी सांगितले.
पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताचे विविध उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.






