इंदापूर

इंदापूरच्या वडापुरी येथे घडली ह्दयद्रावक अशी घटना.

सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू.

इंदापूरच्या वडापुरी येथे घडली ह्दयद्रावक अशी घटना.

सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू.

बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे हृदय पिळवून टाकणारी घटना घडली असून अविष्कार (देव) किशोर शिर्के वय 9 वर्षे आणि अधिराज (ध्रुव) किशोर शिर्के वय 7 वर्षे या दोघ सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला असून शिर्के कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

याबाबत वृत्त असे कि किशोर शिर्के आपल्या कुटुंबासह शिर्के वस्ती येथे राहतात. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. घरापासून जवळचं साधारण 200 मीटर अंतरावार त्यांचे स्वत:चे शेततळे आहे. दि.17 सप्टेंबर रोजी दुपारी एक च्या दरम्यान अविष्कार, अधिराज आणि यांचा चुलत भाऊ नाथ हे तिघे नेहमीप्रमाणे खेळायला गेले. खेळता खेळता ते शेततळ्याकडे गेले आणि याच दरम्यान अविष्कार आणि अधिराज हे दोघे सख्खे भाऊ शेततळ्यातील पाण्यात पडले. ही घटना घडताच त्यांच्या सोबत असणारा त्यांचा चुलत भाऊ नाथ प्रल्हाद शिर्के वय 9 वर्षे हा घाबरला. मात्र त्याच अवस्थेत त्याने शिर्के यांच्या घरी पळत येऊन अविष्कार व अधिराज पाण्यात पडल्याची माहीती दिली. त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी शेततळ्याकडे धावा घेतला. मुलांना पाण्यातून बाहेर काढून तात्काळ पुढील उपचार कामी इंदापूर येथे आणले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

किशोर शिर्के व शितल शिर्के या दांमत्यास ही दोनच मुले होती. मात्र ऐण सणासुदीच्या दिवशी काळाने घाला घातला आणि ही दोन्ही पाखरे दिसेनाशी झाली. ही घटना गावभर पसरताचं संपूर्ण गावात शोककळा पसरली. मातृत्वाला हेलावून टाकणारी घटना असल्यामुळे या घटनेबाबत राजकीय,सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींमधून हलहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button