बारामतीच्या चेतन शहांवर महाराष्ट्राची धुरा; जैन हुम्मड फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड
इंदूरच्या राष्ट्रीय बैठकीत बारामतीच्या चेतन शहा यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी; शपथविधी सोहळ्यास देशभरातील मान्यवरांची उपस्थिती.

बारामती वार्तापत्र
फेडरेशन ऑफ जैन हुम्मड समाज महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी बारामतीचे चेतन अनिलकुमार शहा (वाल्हेकर) यांची निवड झाली आहे. इंदूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या राष्ट्रीय बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी चेतन शहा यांचा शपथविधीही उत्साहात पार पडला.
या शपथविधी सोहळ्यास महाराष्ट्राच्या महामंत्री तनुजा शहा (निरा) यांच्यासह सतीश ल्होरा (अकोला), वैभव शहा (वडूज), राकेश जैन (धुळे), मिलिंद मेहता (मुंबई), प्रशांत शहा (छत्रपती संभाजीनगर), चेतन गांधी (पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मंदार शहा (वडूजकर), कौशल शहा (सराफ), गौरव कोठडिया, विशाल शहा वडूजकर यांच्यासह बारामतीकरांचीही या कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.
चेतन शहा हे गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीतील दिगंबर जैन समाजातील ज्येष्ठ श्रावक असून सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या निवडीमुळे बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.