स्थानिक

बारामतीतील जिजाऊ सेवा संघाच्या श्रावणोत्सवाला उत्साहात सुरुवात; मेहंदी स्पर्धेत प्राची कांबळे प्रथम

बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने ‘श्रावण उत्सव पर्व-३’चे आयोजन; महिलांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

बारामतीतील जिजाऊ सेवा संघाच्या श्रावणोत्सवाला उत्साहात सुरुवात; मेहंदी स्पर्धेत प्राची कांबळे प्रथम

बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने ‘श्रावण उत्सव पर्व-३’चे आयोजन; महिलांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

बारामती वार्तापत्र 

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कला-कौशल्याला हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि श्रावण महिन्यातील सण-उत्सव व परंपरांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने ‘श्रावण उत्सव पर्व-३’ या उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.

या उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत प्राची कांबळे यांनी प्रथम क्रमांक, अंजली सल्ले यांनी द्वितीय, संगीता गलांडे यांनी तृतीय, श्वेता भागवत यांनी चतुर्थ, तर प्रज्ञा काकडे यांनी पाचवा क्रमांक पटकावला.

याशिवाय शुभांगी देवकाते, श्रेया गायकवाड, शिवानी गायकवाड, सेजल पवार, अमृता गायकवाड, श्रुती सावंत, स्वप्नाली भोसले, विद्या काटे, प्रेरणा क्षीरसागर आणि सानिया इनामदार यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाला बारामती नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष जयश्री सातव, भगिनी मंडळाच्या विश्वस्त सुनीता शहा, जिजाऊ सेवा संघाच्या विश्वस्त छाया कदम, मार्गदर्शिका विजया कदम, लायन्स क्लबच्या अध्यक्षा राधिका जाचक, पीएमडीच्या संचालिका दीपाली ढवाण, पंचायत समितीच्या माजी सभापती शारदा खराडे, स्वाती शिपटे, मलबार गोल्डच्या चैत्राली उबाळे तसेच स्पर्धेच्या परीक्षक आरती बोकन, पायल ढाइंजे, प्रणिता कदम, रोहित सोनवणे आदी उपस्थित होते.

ग्रामीण तसेच शहरी भागातील नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या महिलांना कला-कौशल्याच्या माध्यमातून श्रावण महिन्यातील सण, उत्सव आणि परंपरांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सेवा संघाच्या उपाध्यक्षा मनीषा शिंदे, कार्याध्यक्षा सुनंदा जगताप, सचिव कल्पना माने, खजिनदार संगीता साळुंखे, सहखजिनदार मनीषा खेडेकर, सहकार्याध्यक्षा भारती शेळके, सहसचिव ऋतुजा नलावडे, वंदना जाधव, सुवर्णा केसकर, वीणा यादव, गौरी पाटील, पूजा खलाटे, अमृता सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना माने आणि पूजा खलाटे यांनी केले, तर आभार मनीषा शिंदे यांनी मानले.

Back to top button