नगर जिल्हा

मोठी बातमी ; राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

पाच जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मोठी बातमी ; राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

पाच जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अहमदनगर,प्रतिनिधी

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर राहुल राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव जवळ ही घटना घडली आहे.

राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हल्लेखोरांचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मंत्र्याच्या पिएवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून काल रात्री जिल्ह्यातील घोडेगाव येथे त्यांच्यावर गोळीबीर करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप समजले नसून अशा प्रकारे मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Check Also
Close
Back to top button