स्थानिक

बारामतीत चायनीज मांजाने तरुण जखमी; कानाला गंभीर दुखापत

जुना मोरगाव रोडवर घरी जात असताना अचानक मांजा आल्याने अपघात; दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण

बारामतीत चायनीज मांजाने तरुण जखमी; कानाला गंभीर दुखापत

जुना मोरगाव रोडवर घरी जात असताना अचानक मांजा आल्याने अपघात; दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला असून, जुना मोरगाव रोड परिसरात चायनीज मांजामुळे एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. रोहित खरात असे जखमी तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित खरात हे जुना मोरगाव रोडवरून दुचाकीवरून घरी जात असताना अचानक त्यांच्या गाडीसमोर मांजा आला. मांजा दिसून न आल्याने तो चेहऱ्यावर आणि कानाच्या भागाला लागला. यामध्ये त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून चेहऱ्यावरही जखम झाली आहे.

या घटनेमुळे शहरातील रस्त्यांवर चायनीज मांजाचा धोका किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना रस्त्यावरून प्रवास करताना अचानक समोर येणाऱ्या मांजामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण

चायनीज मांजा अत्यंत धारदार असल्याने तो रस्त्यावर आडवा आल्यास दुचाकीस्वारांच्या चेहरा, मान किंवा शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अशा मांजाचा वापर अथवा विक्री होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, प्रशासनाने चायनीज मांजाची विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button