क्राईम रिपोर्ट

बारामतीत बुलेट-स्प्लेंडरचा कर्णकर्कश आवाज आता महागात! २८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

२८ वाहनांवर कारवाई; २८ हजारांचा दंड, ७ सायलेन्सर जप्त

बारामतीत बुलेट-स्प्लेंडरचा कर्णकर्कश आवाज आता महागात! २८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

२८ वाहनांवर कारवाई; २८ हजारांचा दंड, ७ सायलेन्सर जप्त

बारामती वार्तापत्र 

मोटरसायकलला मॉडिफाइड सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत बुलेट तसेच स्प्लेंडर यांसह मोठा आवाज करणाऱ्या एकूण २८ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत वाहनचालकांकडून एकूण २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आलेले सात सायलेन्सर जप्त करण्यात आले.

मॉडिफाइड सायलेन्सरमुळे वाहनांचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे नागरिकांना त्रास होण्यासोबतच ध्वनीप्रदूषणाची समस्या निर्माण होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या प्रकारांविरोधात कारवाई अधिक तीव्र केली आहे.

पुढे आढळल्यास कडक कारवाईचा इशारा

मोटरसायकलला नियमबाह्य किंवा मोठा आवाज करणारा सायलेन्सर लावून वाहन चालवताना कोणी आढळल्यास यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बारामती तालुका पोलिसांनी दिला आहे.

नागरिकांनी आपल्या वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करू नयेत तसेच मोठा आवाज करणारे सायलेन्सर वापरू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

‘गाडीचा आवाज नाही, सुरक्षिततेचा आवाज महत्त्वाचा!’ असा संदेश देत बारामती तालुका पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button