कोरोंना विशेष

“राज्य मास्कमुक्त केव्हा होणार? अखेर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलंच

कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्व गेल्या 2 वर्षांपासून लढा देत आहोत.

“राज्य मास्कमुक्त केव्हा होणार? अखेर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलंच

कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्व गेल्या 2 वर्षांपासून लढा देत आहोत.

मुंबई :प्रतिनिधी

राज्यात आता कोरोनाचा जोर बऱ्याच प्रमाणात ओसरला आहे. अनेक निर्बंध हे शिथिलही करण्यात आले आहेत. मुंबईही फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत अनलॉक (Mumbai Unlock) होण्याची चर्चा आहे. त्यामुळे आता लवकरच राज्य मास्कमुक्त होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्र मास्कमुक्त केव्हा होणार, या शक्यतेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं आहे.कोरोना रोखण्यासाठी मास्क हेच प्रमुख शस्त्र आहे.

अजित पवार काय म्हणाले? 

“राज्य मास्कमुक्त अजिबात नाही. तशी चर्चाही नाही.  उगीच अफवा पसरवू नका. जेव्हा मास्कमुक्त होण्याचा निर्णय घेऊ तेव्हा पत्रकार परिषद घेऊ”, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कमुक्तीच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली.

Check Also
Close
Back to top button