बारामती तालुक्यातील सुपे येथे ट्रकची धडक; महिला गंभीर जखमी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

बारामती तालुक्यातील सुपे येथे ट्रकची धडक; महिला गंभीर जखमी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सुपे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात वरवंड येथील एक महिला गंभीर जखमी झाल्या. मालवाहू ट्रकच्या धडकेत हा अपघात घडला असून, सुनंदा अरुण गायकवाड (रा. वरवंड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा गायकवाड या सुपे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकातून जात असताना भरधाव मालवाहू ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण काय, तसेच संबंधित ट्रकचालकाची जबाबदारी याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
या अपघातामुळे काही काळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक परिसरात वाहतूक मंदावली होती आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.







