राजकीय

बारामती विजयानंतर;राज्यसभा खासदारकी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोडली

राजकारणात नव्या पर्वाची सुरुवा

बारामती विजयानंतर;राज्यसभा खासदारकी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोडली

राजकारणात नव्या पर्वाची सुरुवा

बारामती वार्तापत्र

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी औपचारिकरीत्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदासह महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या सक्रिय राजकारणात उतरल्या आणि बारामती पोटनिवडणुकीत त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. याच मतदारसंघात अजित पवार यांनी यापूर्वी १ लाख ६५ हजार मताधिक्याचा विक्रम केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी तब्बल १,१८,९३० मतांच्या फरकाने विजय मिळवत हा आकडा मागे टाकला.

या विजयानंतर बारामतीत जल्लोषाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. या विजयामुळे बारामतीच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

सुनेत्रा पवार यांचा मुंबईत सत्कार

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मंगळवारी मुंबई येथे सत्कार करण्यात आला. पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.

Back to top button