स्टेट बँक ऑफ इंडिया बारामती शाखेत कॉइन मेळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
व्यापाऱ्यांना व्यवहारात मोठी मदत होणार

स्टेट बँक ऑफ इंडिया बारामती शाखेत कॉइन मेळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
व्यापाऱ्यांना व्यवहारात मोठी मदत होणार
बारामती वार्तापत्र
स्टेट बँक ऑफ इंडिया, बारामती मुख्य शाखेच्या वतीने आज कॉइन मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10:30 ते दुपारी 4:00 या वेळेत पार पडलेल्या या मेळ्यास बारामतीतील व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दैनंदिन आर्थिक व्यवहार अधिक सुरळीत व सुलभ व्हावेत या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळ्यात एकूण 22 लाख रुपयांच्या नाण्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये 220 व्यापाऱ्यांना प्रत्येकी रुपये 10,000 किमतीची नाणी देण्यात आली. वाटप करण्यात आलेल्या नाण्यांमध्ये ₹20, ₹10 व ₹2 मूल्यांच्या नाण्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बारामतीचे नगराध्यक्ष श्री सचिन सातव यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या उपक्रमामुळे व्यापाऱ्यांना व्यवहारात मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाखेचे मुख्य प्रबंधक श्री आदित्य गोगटे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये नाण्यांचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे व्यापारी व ग्राहक दोघांनाही मोठा फायदा होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री सुशीलकुमार सोमाणी, उपाध्यक्ष श्री शैलेश साळुंके, कार्याध्यक्ष श्री जगदीश पंजाबी, महावीर पथ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री मनोज खुटाळे, श्री प्रवीण आहुजा, अॅड. खारतुडे साहेब, श्री श्याम तीवाटणे तसेच इतर अनेक प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखेचे कॅश ऑफिसर श्री किरण बनकर, श्री प्रकाश निंबाळकर आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.
स्टेट बँक ऑफ इंडिया बारामती शाखेच्या या उपक्रमाचे व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात आले असून भविष्यातही अशा उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थित व्यापाऱ्यांनी व्यक्त केली।






