इंदापूर

निमगाव केतकी येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.

भिगवण पाठोपाठ निमगाव केतकी येथील कोविड केअर सेंटर चे उदघाटन.

निमगाव केतकी येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.

भिगवण पाठोपाठ निमगाव केतकी येथील कोविड केअर सेंटर चे उदघाटन.

इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भिगवण पाठोपाठ इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज दि.14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले.

भिगवण पाठोपाठ निमगाव केतकी येथील कोविड केअर सेंटर कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सज्ज झाले असून यामुळे इंदापूर येथील सेंटरवर पडणारा ताण कमी होणार आहे. परिसरातील नागरिकांना या (CCC) मुळे सोयीस्कर होणार असून या पाठोपाठ बावडा येथील सेंटरचे काम प्रगतीपथावर असून त्याचाही लवकरच शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

यावेळी बोलताना भरणेंनी तालुक्यातील जनतेला कोरोनाला घाबरू नका पण काळजी घ्या शासनाने घालून दिलेल्या नियम अटींचे पालन करा असे आवाहन केले आहे.

यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,तहसीलदार सोनाली मेटकरी,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, डॉ.एकनाथ चंदनशिवे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा पोळ, निमगाव केतकीचे मा.सरपंच दशरथ डोंगरे, मा. उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे,मनोहर मिसाळ,अतुल मिसाळ, संजय राऊत,अभिजित गुरव, शिवसेनेचे बबन खराडे, कचरवाडीचे कुंडलिक कचरे, डॉ. रमेश शेंडगे डॉ.सुहास शेळके, अँड. सचिन राऊत यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button