माळेगावची निवडणूक पुन्हा राज्यात चर्चेची ठरणार…शेवटच्या दिवशी अजितदादांचा मास्टर स्ट्रोक! ‘रिंगणात’ उतरले, अर्ज दाखल
तब्बल ५९३ अर्ज दाखल

माळेगावची निवडणूक पुन्हा राज्यात चर्चेची ठरणार…शेवटच्या दिवशी अजितदादांचा मास्टर स्ट्रोक! ‘रिंगणात’ उतरले, अर्ज दाखल
तब्बल ५९३ अर्ज दाखल
बारामती वार्तापत्र
माळेगाव कारखाना रणधुमाळी : सत्ताधारी-विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु, तुल्यबळ उमेदवार निवडीवर भर विरोधकांच्या तुलनेत तुल्यबल आणि तरुण उमेदवार निवडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. पवारांचे प्रतिस्पर्धी व ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे स्वतःच या निवडणुकीत पुन्हा उतल्याने दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
आज मंगळवार (ता. २७) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.या निवडणूक तब्बल ५९३ अर्ज दाखल झाले आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठीही तब्बल ६०० अर्ज दाखल झाले होते.माळेगाव मध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे असल्याने या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत.
आज खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटलं आहे.ब वर्ग संस्था मतदार संघातून अजितदादांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. पवार हे स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनेलमध्ये सहभागी होतात का हा खरा उत्सूकतेचा विषय झाला आहे. तसे झाल्यास पक्षाच्या पॅनेलला खूपच वजन प्राप्त होणार असल्याचे मानले जाते.त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पन्नास पेक्षा अधिक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज ऐनवेळी दाखल केले.
पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे, कष्ठकरी शेतकरी संघटनेनेही या निवडणूकीत दंड थोपटत तुल्यबळ उमेदवारांचे अर्ज दाखल केले. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हे राजकीय चित्र स्पष्ट झाले.
‘सहा गटातून पुरेसे अर्ज आल्याने आम्हीसुद्धा सत्ताधाऱ्यांना पर्याय होऊ शकतो,’ असा विश्वास शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश खोमणे यांनी व्यक्त केला. या प्राप्त स्थितीचा विचार करता `माळेगाव`वर प्रभाव कोणाचा दिसतो, हा खरा उत्सुकतेचा विषय झाला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे सत्ताधारी संचालक मंडळ पाच वर्षांपासून माळेगाव कारखान्यावर कार्य़रत राहिले. दरम्यानच्या कालावधीत पवारसाहेब आणि अजित पवार यांचे स्वतंत्र पक्ष कार्यरत झाले. त्यानुसार गाव पातळीवर, तसेच सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन गट पडले.
त्याचा परिणाम आता माळेगावच्या निवडणूकीतही दिसू लागला आहे. ‘आमचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही या कारखान्याच्या निवडणूकीत भाग घेण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत. त्यामुळे निवडणूकीत तडजोड करायची की लढायचे हे सर्वस्वी युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे ठरविणार आहेत,’ असे मत सतिश खोमणे, एस.एन.जगताप आदींनी व्यक्त केले.